भारतीय हवाई दलाने पुलवामा आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. दि. २६ रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोट भागात असलेल्या जैश - ए - मोहम्मद च्या सर्वात मोठ्या प्रशिक्षण तळावर १००० किलोची स्फोटके टाकून ते जमीन दोस्त केले. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. भारताच्या जोरदार एअर स्ट्राईकनंतर हल्ल्यावर प्रतिक्रिया येत आहेत. सर्वच विरोधी पक्षांनी आणि सेलिब्रेटींनी भारतीय हवाई दलाचे जोरदार कौतुक केले. भारताचा माजी मास्टर ब्लास्टर फलंदाज आणि भारतीय हवाई दलातील मानद ग्रुप कॅप्टन असलेला सचिन तेंडुलकर कसा मागे राहील. त्यानेही ट्विट करुन भारतीय हवाई दलाला सलाम केला असून, मागील काही दिवसांपासून इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना खेळावा की नाही यावरुन जोरदार चर्चा आणि टीका झाली होती. याचर्चेत सचिनने सामना न खेळून फुकटात पाकिस्तानला २ गुण देण्याला विरोध दर्शवला, यावरुन त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त कारवाईवर प्रतिक्रिया देताना ट्विट केले. या ट्विटमध्ये तो म्हणतो की,‘आमचा चांगुलपणा हा कमकुवतपणा समजू नका. भारतीय हवाई दलाला माझा सलाम. जय हिंद.’त्यामुळे आता आपल्या देशाच्या सैनायामागे सर्व देश उभा राहिला आहे.