300 दिवस झोपणारी व्यक्ती, झोपेतच जेवण भरवलं जातं

बुधवार, 14 जुलै 2021 (16:38 IST)
राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातही एक व्यक्ती आहे, जी वर्षामध्ये 300 दिवस झोपते. खाण्यापासून अंघोळीपर्यंत सर्व काही झोपेमध्ये होते. हे आश्चर्यकारक वाटत असलं तरी सत्य आहे. येथील भादवा गावातील एक व्यक्ती तब्बल 300 दिवस झोपते. या व्यक्तीचं नाव आहे पुरखाराम. 2 वर्षीय पुरखाराम एका विचित्र आजाराने ग्रस्त आहे. लोक त्याला कुंभकर्ण म्हणतात.
 
पुरखाराम यांना झोपल्यानंतर उठणं कठीण होतं. त्यांच्या घरातील लोकं त्यांना झोपेतच जेवण भरवतात. हा अजबच आजार पहिल्यांदा समोर आला आहे. 
 
पुरखारामला अ‍ॅक्सिस हायपरसोम्निया नावाचा आजार आहे. या आजारामध्ये व्यक्ती निद्रानाश होते. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की एकदा झोपल्यावर ते 25 दिवस झोपेतून उठत नाहीत. पुरखाराम यांना वयाच्या 18 व्या वर्षी या आजाराची लागण झाली. सुरुवातीच्या टप्प्यात, ते 5 ते 7 दिवस झोपायचे, परंतु त्यांना जागं करणं फार कठीण होतं. त्रस्त कुटुंबातील सदस्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेले आणि त्याच्यावर उपचारही केले, परंतु हा आजार पकडला गेला नाही. हळूहळू, पुरखारामची झोपेची वेळ वाढली आणि आता ते एका महिन्यात 25 दिवस झोपतात. 
 
वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार ठीक होणार नाही असं नाही. पण याला प्रॉपर ट्रिटमेंटची गरज आहे. डॉक्टर या आजाराला दुर्मिळ आजार म्हणत आहेत. मात्र पुरखाराम यांच्या कुटुंबियांनी आशा कायम ठेवली आहे. त्यांची पत्नी लिछमी देवी यांच म्हणणं आहे की,'गावात त्यांचं एक दुकान आहे. मात्र ते कायमच या आजारामुळे बंद असते. वृद्ध आईने सांगितले की सध्या मी शेतीमध्ये राहत आहे, परंतु मला एक नातू आणि दोन नातवंडे यांचे शिक्षण आणि त्यांचे भविष्य याबद्दल काळजी वाटते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती