राज ठाकरे यांनी अशा दिल्या लतादीदीं शुभेच्छा

शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (15:37 IST)
आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अगदी कलाविश्वापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लतादीदींसोबतचे जुने फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
‘आई, मुलगी, प्रेयसी, बहीण, मैत्रीण,पत्नी ह्या सर्व नात्यांना पडद्यावर ज्या एका अद्भुत आवाजाने गेली ७७ वर्ष घट्ट बांधून ठेवलं त्या लतादीदींचा आज वाढदिवस…. दीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा’, असं कॅप्शन देत राज ठाकरे यांनी लतादीदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती