'परी' रशियामध्ये रिलीज होणार

गुरूवार, 29 मार्च 2018 (09:21 IST)

अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित  'परी' बॉक्सऑफिसवर कमाल करू शकला नसला तरीही 'परी' या चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे. रशियामध्ये 'परी' रिलीज होणार आहे.  सध्या बॉलिवूड सिनेमे परदेशात रीलिज करण्याचा ट्रेड वाढला आहे. सलमान खान, आमिर खान पाठोपाठ आता अनुष्का शर्माचा चित्रपट साता समुद्रापार पोहचला आहे. अनुष्का शर्मा ही पहिली अभिनेत्री आहे, जिचा सिनेमा सातासमुद्रापार पोहचला आहे. परी हा थरारपट आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट सुपर नॅचरल थ्रिलर आहे.  

अनुष्का शर्माने ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी शेअर केली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही बातमी दिली आहे. येत्या 19 एप्रिलला रशियामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. ही बातमी शेअर करताना आनंद होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती