ऑनलाईन स्मार्टफोन विक्री जोरात, सुमारे ३८ टक्के वाढ

शनिवार, 16 जून 2018 (09:20 IST)
ऑनलाईन स्मार्टफोन विक्री ३८ टक्क्यांवर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ई-मार्केटमध्ये स्मार्टफोन विक्रीचा हिस्सा देशातील एकूण विक्रीपैकी ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. या विक्रीमध्ये फ्लिपकार्ट प्रथम स्थानावर असून कंपनीचा हिस्सा ५४ टक्के आहे. यानंतर अॅमेझॉन३० आणि एमआय डॉट कॉमचा वाटा १४ टक्के असल्याचे काऊन्टरपॉईन्ट रिसर्चने अहवालात म्हटले आहे. 
 
जानेवारी-मार्च कालावधीत ऑनलाईन विक्रीमध्ये सर्वाधिक हिस्सा शाओमी कंपनीचा आहे. गेल्या तिमाहीत ऑनलाईन विक्रीमध्ये ५७ टक्के वाटा आपल्याकडे घेत पहिले स्थान पटकाविले. यानंतर सॅमसंग १४ टक्के आणि हयुवाई  ८ टक्क्यांवर आहे. तर मार्च तिमाहीत ऑफलाईन विक्रीच्या तुलनेत ई व्यापार क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. देशातील ऑफलाईन क्षेत्रातील विक्री वर्षाच्या आधारे ३ टक्क्यांनी घसरली असून ऑनलाईन विक्री ४ टक्क्यांनी वाढल्याचे काऊन्टरपॉईन्टचे रिसर्चने स्पष्ट केलेय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती