निरव मोदीचे घर अलिबाबाची गुहा कोट्यावधींचे दागिने, चित्रे

शनिवार, 24 मार्च 2018 (16:13 IST)
आर्थिक फसवणूक करत देशातून पळून गेलेला नीरव मोदीच्या संपत्तीचा तपास सध्या सुरु आहे. या प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११,४०० कोटींचा चुना लावणारा अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीच्या मुंबईतील वरळी भागात असलेल्या घराची सीबीआय आणि ईडीकडून शुक्रवारपासून तपासणी सुरू हे. यावेळी त्याच्या घरात कोट्यवधी रुपयांच्या वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे दिपून गेले आहेत.  देशभरात विविध ठिकाणी असलेल्या त्याच्या मालमत्तेवर छापे घालण्यात आले. वरळीतील ‘समुद्र महाल’मधील त्याच्या घरात सीबीआय आणि ईडी तपासणी करत असून आतापर्यंत १.४० कोटी रुपयाचे एक घड्याळ आणि १० कोटी रुपयाची एक अंगठी याच्यासह कोट्यवधी रुपयाचे अन्य दागिने आणि चित्रे सापडली आहे. आणखी दोन दिवस हा तपास सुरू राहणार असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सीबीआय ने इतर ठिकाणी असलेली त्याच्या संपतीवर टाच आणली असून ती ताब्यात घेतली जात आहे. ही कारवाई अजून व्यापक करत त्याच्या विरोधात सर्व पुरावे गोळा करण्यात येणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती