दोन दिवसांपूर्वीच अभिनेते नाना पाटेकर यांनी कोल्हापूर आणि सांगली येथे जाऊन पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेतल्या. कोल्हापूरकरांची, सांगलीकरांची दुःख अमित शाह यांच्या कानावर घालून लवकरात लवकर मदत पाठवण्यासंदर्भात त्यांनी विनंती केली का? हे समजू शकलेले नाही. नाना पाटेकर यांच्या राजकीय एन्ट्रीची याआधीही बरीच चर्चा झाली होती.
मात्र, त्यांनी यास नकार देत राजकारणात प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र, आज शहांच्या भेटीमुळे पुन्हा नाना पाटेकर चर्चेत आले आहेत. पाटेकर यांनी अमित शहा यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यानंतर त्यांनी ही भेट खासगी होती, राजकीय नव्हती असे सांगितले आहे. शहा यांना भेटण्याआधी पाटेकर यांनी अंतर्गत सुरक्षा विशेष अधिकारी यांची भेट घेतली.