स्वच्छता सर्वेक्षणात मप्र ला तीन पुरस्कार, इंदूर परत नंबर वन

बुधवार, 6 मार्च 2019 (13:09 IST)
अहिल्या नगरीच्या नावाने प्रसिद्ध मध्यप्रदेशाची आर्थिक राजधानी इंदूर परत एकदा स्वच्छता सर्व्हेमध्ये नंबर वन आला आहे. ही तिसरा मोका आहे जेव्हा इंदूरने ही यश मिळवले आहे. भोपाळने स्वच्छतम राजधानीचा पुरस्कार जिंकला, जेव्हाकी महाकाल नगरी उज्जैन 3 ते 10 लाखापर्यंत लोकसंख्या असणार्‍या शहरांमध्ये शीर्ष स्थानावर राहिला.  
 
दिल्लीच्या विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इंदूरच्या महापौर मालिनी गौड, नेता प्रतिपक्ष फौजिया अलीम आणि नगरीय प्रशासन मंत्री जयवर्धनसिंह यांना हा पुरस्कार प्रदान केला.  
इंदूरला एक अवार्ड रँकिंग, दुसरा फाइव स्टार रेटिंग आणि तिसरा अवार्ड इनोवेटिव्ह श्रेणीचे आयोजन (सैयदना की वाअज) साठी देण्यात आला आहे. 
 
महत्त्वाचे म्हणजे सर्व्हेसाठी जानेवारीमध्ये आलेली दिल्लीची टीम आठवड्याभर थांबली होती. स्वच्छता पुरस्कारासाठी देशातील 4 हजार 237 शहरांचा सर्व्हे करण्यात आला होता.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती