प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत राज्य पहिले

गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (09:26 IST)
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, देशभरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ६१ लाख आहे. यात महाराष्ट्र ११,०६,०८७ लाभर्थ्यांसह अग्रस्थानी आहे अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने राज्यसभेत काँग्रेसचे कपिल सिबल यांनी दिली आहे. 
 
आॅगस्ट २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेतहत २६ जुलै २०१८ पर्यंत ६१ लाख १२ हजार ५२७ जणांना लाभ मिळाला आहे. मेक इन इंडिया आणि सरकारच्या अन्य योजनांसाठी पूरक म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. विशेष सेवा, वस्त्रोद्योग, तयार कपडे, स्वच्छता, साफ-सफाई, इस्पितळ आणि हिºयांना पैलू पाडणे आदी क्षेत्रातील आस्थापनांचा या योजनेत समावेश आहे. जवळपास २५ क्षेत्रांचा या योजनेत समावेश आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती