सोन्याच्या खाणीवर वसलेले एक गाव….!

हिमालयात जगातील सर्वात उंच अशी दहा पर्वतशिखरे आहेत. हिमालयाच्या पठारावरच तिबेट वसलेले आहे. तिबेटसारखेच पेरू देशातील अँडीज पर्वतावर समुद्र सपाटीपासून 5100 मीटर उंचीवर (साधारण 16 हजार फूट उंचीवर) एक गाव वसले आहे. हे गाव चक्क सोन्याच्या खाणीवरच वसलेले असून, तिथे 30 हजार लोक राहात आहेत. रिनकोनाडा नावाचे हे गाव म्हणजे एक वसाहतच आहे.
 
दक्षिण अमेरिकेत असूनही या भागात प्रचंड थंडी आहे. कारण, त्याची उंची अधिक आहे. येथे राहणारे बहुतेक सर्व मजूर आहेत. पत्र्याच्या शेडमध्येच ते राहतात. गावात रस्ते, पाणी, ड्रेनेज यांची काहीही व्यवस्था नाही.
 
येथील तापमान साधारण 1.2 डिग्री पर्यंत असते. उन्हाळ्यात येथे पाऊस पडतो तर हिवाळा अधिकच भयानक असतो. या पर्वतात सोन्याच्या खाणी आहेत; मात्र येथे कोणतीही कंपनी कायदेशीर उत्खनन करत नाही. येथील सर्व कारभार अवैध रूपातच चालतो. येथील पुरुष खाणीत काम करतात, तर महिला बारीकसारीक खडकांत अडकलेले सोन्याचे कण वेचणे व दुकानदारी करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती