आता व्हॉट्सअॅप करता येतील हृदयाचे ठोके

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (13:28 IST)
आता लोकं आपल्या हृदयाचे ठोके मेल किंवा इतर डिजीटल सर्व्हिसद्वारे कुणालाही पाठवू शकतात. मुंबईच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एका विशेष प्रकाराच्या स्टेथोस्कोप तयार केले आहे. या डिव्हाईसला इंटरनेट आणि ब्लूटूथचा सपोर्ट आहे. सोबतच या डिव्हाईसने यूजर्सच्या हृद्याचे ठोके रेकॉर्ड करून ईमेल किंवा व्हाट्सअॅपद्वारे डॉक्टरांपर्यंत पोहचवता येतील.
 
आयू सिंक असे या स्टेथोस्कोपला नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण लोकांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या या स्टेथोस्कोपद्वारे रिपोर्ट पाठवून डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.
 
या स्टेथोस्कोपद्वारे आजार तसेच मुलांच्या हृद्यात होल असल्याचे माहीत पडू शकतं. हे डिव्हाईस सामान्य स्टेथोस्कोपपेक्षा 35 पटीने चांगले असल्याचे सांगितले जात आहे. यात आयू शेअर अॅप वापरण्यात येईल. याने हृद्याचे ठोके रेकॉर्ड करता येतील.
 
याद्वारे लांब किंवा दुसर्‍या शहरात बसलेले डॉक्टर्सदेखील रिपोर्ट बघून आजारांना उपचारासाठी सल्ला देऊ शकतात. यात जंबो बॅटरी देण्यात आली असून 18 तास काम करते. या डिव्हाईसची किंमत सुमारे 14 हजार रुपये आहे.  महाराष्ट्र आरोग्य विभागाने सध्या 100 स्टेथोस्कोप तयार केले असून हे गावात पाठवले जातील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती