पावणे दोन कोटी रुपयांचे अंडे

बुधवार, 20 जून 2018 (12:54 IST)
जगात एका बाजूला अफाट श्रीमंती, सधनता, समृद्धी आहे, तर दुसर्‍या बाजूला गरिबी, दारिद्र्य, कुपोषण, उपासमारी आहे. या दुसर्‍या वर्गाचं निम्मं आयुष्य श्रीमंतांच्या झगमगाटाकडं पाहून खंत बाळगण्यातच जात असतं. श्रीमंतांची अय्याशी पाहून नशिबाला दोष देत ते आपलं जीणं जगत असतात. त्यांना रोजच्या भाकरीची भ्रांत असते; पण त्याच वेळी श्रीमंत वर्गातील कोणी तरी लाखो रुपयांचा पेन खरेदी करताना दिसतो. कधी कुणी सोन्याचा शर्ट तयार करतो, तर कधी कोणी हिर्‍यांनी जडलेला मोबाइल!
 
आता हेच पाहा ना! रोजच्या खाण्यातला पदार्थ असणारे अंडे कधी हिर्‍यांनी जडलेले असू शकते याची कल्पना तरी तुम्ही केली होती का? पण असं घडलं आहे. हे अंडे एखाद्या आलिशान घरापेक्षाही महागडे आहे. हे अंडे साधे अंडे नसून 18 कॅरेटच्या 910 व्हाईट गोल्ड हिरेजडित आहे. लंडनमधील एका ज्वेलरी ब्रँडने या अंड्याची निर्मिती केली आहे. 'डायमंड मेरी एग' असे या अंड्याचे नाव आहे. त्याची किंमत 1 कोटी 75 लाख रुपये आहे. इतक्या किमतीत आलिशान बंगलाही उभा राहू शकतो. या अंड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन छायाचित्रे लावण्याची यामध्ये सुविधा आहे. अशी छायाचित्रे लावून हे अंडे गळ्यातही एखाद्या लॉकेटसारखे अडकवता येऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती