दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. सध्या ब्रिटानीयाची गुड डे, लॉरियल,तनिष्क अशा काही ब्रॅण्डसह २३ जाहीरातींमध्ये दीपिका दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवरून दीपिकाच्या जाहीराती गायब आहेत. दीपिकाने जेएनयूत जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांनतर या जाहीरात कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता हा वाद मिटेपर्यंत या जाहीराती दाखवल्या जाणार नाहीयेत.