गोविंदांनो नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई होणार

सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (09:09 IST)
दहीहंडीत भाग घेणाऱ्या गोविंदांवर वयाची मर्यादा असून १४ वर्षाखालील मुलांमुलींच्या सहभागावर मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे. दहीहंडी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे स्पष्ट संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहे.
 
गोविंदा उत्सवादरम्यान १४ वर्षाखालील मुलां-मुलींचा सहभाग आढळल्यास मुलांचे पालक, गोविंदा पथकांचे प्रमुख आणि आयोजक या सगळ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर आणि गोविंदांच्या वयोमर्यादेवर निर्बंध घातले होते. त्यानंतर नियमांसंदर्भात अनिश्चिततेच वातावरण होते. राज्य सरकारने दहीहंडीचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात केल्यानंतर आता किती थर लावायचे यावर कोणतेही बंधन नाही. मात्र, वयोमर्यादेची अट उच्च न्यायालयाने कायम ठेवली असल्याने मंडळांसह आयोजकांनाही ही अट काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती