या ब्रिटीश महिलेला देशातून जात असताना एअरपोर्टवर अटक करण्यात आली कारण तिने एका युक्रेनी तरुणीविरोधात अपशब्दाचा वापर केला होता. युक्रेनी तरुणीने तिची तक्रार केली होती. ब्रिटीश महिलेने युक्रेनी तरुणीविरोधात F*** YOU या शब्दाचा वापर केला होता. आणि या एका शब्दामुळे तिला दोन वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यावर ब्रिटीश महिलेने युक्रेनी तरुणीची माफी मागितली आणि तक्रार मागे घेण्यास विनंती केली मात्र तिच्या रुममेटने केस मागे घेण्यास नकार दिला. आता दोन वर्षांसाठी तिला तुरुंगात पाठविण्यात आलं आहे. म्हणून दुसर्या देशात वावरताना तेथील नियम-कायदे माहित असणे किती आवश्यक आहे हे कळतं.