१० ऑगस्टपासून ट्विटवर अभद्र कमेंट करणारा ब्लॉक

मंगळवार, 31 जुलै 2018 (00:28 IST)
येत्या १० ऑगस्टपासून ट्विटवर लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान अभद्र कमेंट करणाऱ्या युजरला ब्लॉक करण्यात येणार आहे. नियमित अभद्र भाषा वापरणाऱ्या युजर्सच्या अकाऊंटसची पडतळाणी करून आपल्या पेरिस्कोप समुदायच्या दिशानिर्देशांना अधिक आक्रमक पद्धतीने लागू करण्यात येणार आहे. पेरिस्कॉप ब्लॉगस्पॉटनुसार, 'आम्ही १० ऑगस्टपासून ब्लॉक अकाऊंटचा रिव्ह्यू घेऊन आमच्या नियमांचे उल्लंघन होतय का ते पाहू.' जर कोणी याचं उल्लंघन करत असेल तर संबंधित ट्विट रिपोर्ट करण्याचे आवाहनही करण्यात आलंय. 
 
एक सुरक्षीत सेवा देण्यासाठी आम्ही नियमित प्रयत्न करीत आहोत. लाईव्ह प्रसारणादरम्यान पाठवल्या जाणाऱ्या चॅटवर आमचे अधिक लक्ष असणार असल्याचे पेरिस्कॉप ब्लॉगस्पॉटमध्ये म्हटलंय. पेरिस्कोप आणि ट्विटरच्या सर्व प्रसारणांना हे लागू होईल. जेव्हा कोणी युजर अभद्र कमेंट करेल तेव्हा पेरिस्कोप इतर युजर्सना निवडेल जे त्या कमेंटवर आपला रिव्ह्यू देईल. त्यानंतर ती कमेंट ठेवायची की युजरलला ब्लॉक करायचं हे ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती