बच्चन यांचा शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकार

नायक अमिताभ बच्चन यांनी राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी २५ लाख रुपये भरले आहेत. त्याच बरोबर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.
 
सरकारकडून ४४ कुटुंबियांची यादी आम्हाला मिळाली. त्यांच्यासाठी आम्ही एक कोटी रुपये किमतीचे ११२ डिमांट ड्राफ्ट दिल्याचे अमिताभ यांनी सांगितले. सरकार नियमानुसार यातील ६० टक्के रक्कम शहीद जवानाच्यां पत्नीला दिली जाते तर ४० टक्क्यांपैकी २० टक्के जवानाच्या वडीलांना आणि २० टक्के रक्कम आईला दिली जाते. असे ते म्हणाले.
 
शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात मी नेहमी वाचत असतो. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. तेव्हा वाचले होते की केवळ १५, २० आणि ३० हजार कर्जाची रक्कम न भरता आल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा मी ४० ते ५० शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम भरली होती. आता कर्जबाजारी झालेल्या २०० शेतकऱ्यांचे १.२५ कोटी रुपयांच्या रक्कम कर्जखात्यावर जमा केली आहे असे सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती