बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार प्रभावी सामाजिक चित्रपट 'पॅडमॅन'मुळे फेब्रुवारी महिन्यात स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असल्याचे दिसून आले आहे. अक्षयला 'पद्मावत' चित्रपटाच्या सुमारास तरूण पिढीचा 'हार्टथ्रॉब' रणवीर सिंहने मागे टाकले होते. पण खिलाडी कुमार 'पॅडमॅन'च्या रिलीजच्या महिन्यात लोकप्रियतेमध्ये पहिल्या क्रमांकावर, दुसर्या क्रमांकावर अमिताभ बच्चन, सलमान खान तिसर्या आणि शाहरुख खान चौथ्या स्थानावर होते. तर रणवीर सिंह पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. ही क्रमवारी नंतरच्या आठवड्यांत पाठीपुढे होत होती परंतु स्कोर ट्रेंड्सच्या प्रवक्त्याने महिन्याभराच्या गुणांच्या आकडेवारीनुसार अग्रस्थानी असलेले नाव जाहीर केले. जानेवारी महिन्यात 57.67 गुणांसह तिसर्या स्थानी असलेला अक्षय फेब्रुवारी महिन्यात 36.83 गुणांची आघाडी घेत, 94.50 गुणांसह अग्रस्थानी पोहोचला. लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी अमेरिकेच्या 'स्कोर ट्रेंड्स इंडिया' या मीडिया-टेक कंपनीने दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विनी कौल ह्याविषयी सांगतात की आम्ही 14 भारतीय भाषांधील 600 बातम्यांच्या स्रोताद्वारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार हा डेटा मिळतो.