पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असंही शहर आहे, ज्या शहरात लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाहीये. या शहराचं नाव कामिकात्सु असं आहे. हे शहर जपानच्या शिकोकू द्वीपावर आहे.
इथे 45 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये खराब साहित्य ठेवलं जातं. उदा. पेपर, मॅगझिन, कार्टन, मेटल, प्लॅस्टिकच्या बॉटल, स्टीलची भांडी, अॅल्युनियच्या कॅन्स, बल्ब आणि असेच काही 45 प्रकारचे साहित्य. कामिकात्सुमधील लोक जगातल्या इतर ठिकाणांप्रमाणेच वेगवेगळ्या साहित्यांचा, वस्तूंचा वापर करतात. त्यामुळे त्यापासून कचराही इतर ठिकाणांसारखाच तयार होत असेल. पण त्याची विल्हेवाट लावण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे.