या लग्नात संगीत सोहळ्यापासून सगाई आणि हळदी आणि मेहंदीपर्यंतचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले.दोन्ही कुटुंब एकत्र होते आणि त्यांनी आनंदाने जोडप्याला आशीर्वाद दिला.गे कपलच्या हळदी आणि लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.अभिषेकने पारंपारिक बंगाली वर म्हणून धोती आणि कुर्ता घातला होता, तर चैतन्यने शेरवानी घातली होती.
चैतन्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.सोशल मीडियावर लोक या जोडप्याचे जोरदार अभिनंदन करत आहेत.दोघांचा आनंद फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे.भारतातील पहिला समलिंगी विवाह 2017 मध्ये झाला होता.आयआयटी ऋषींनी व्हिएतनामच्या विन्हसोबत लग्न करून इतिहास घडवला.हे लग्न 30 डिसेंबर 2017 रोजी झाले होते.