धुळ्यातून प्रताप सोनवणे विजयी

धुळे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसमधील अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीच्‍या राजकारणाचा फटका कॉंग्रेसला भोगावा लागला असून तेथून भाजपचे प्रताप सोनवणे हे 10 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्‍यांनी निकटतम प्रतीस्‍पर्धी कॉंग्रेसचे अमरीशभाई पटेल यांना पराभूत केले.

या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार पटेल यांना त्‍यांच्‍याच पक्षाच्‍या आ.रोहिदास पाटील गटाकडून उघड विरोध होता. पाटील यांनी पटेल यांच्‍या सरळ विरोधात प्रचार केला होता. तर धुळ्याला नव्‍याने जोडल्‍या गेलेल्‍या मालेगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी केलेले निहाल अहमद यांच्‍यामुळे मुस्लिम मते फुटले. त्‍याचा फटकाही पटेल यांना भोगावा लागला आहे.

वेबदुनिया वर वाचा