किरीट सोमय्या नकोच मागणीवर शिवसैनिक ठाम मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

बुधवार, 27 मार्च 2019 (17:55 IST)
राज्यात शिवसेना-भाजप ने युती केली आणि पुन्हा कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. मात्र मुंबईत वेगळे वातावरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेमध्ये बैठक झाली. यात भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊच नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या तिकीट मिळण्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
 
किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवसैनिकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोमय्यांची तक्रार 
 
करत त्यांना तिकीट देऊच नका अशी भूमिका घेतली आहे. भाजपनेही अजूनही ईशान्य मुंबईच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा 
 
निवडणुकीसाठी या मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये ईशान्य मुंबईत कुणाला तिकीट द्यायचे 
 
याबाबत भाजपा विचार करत आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर मनपा निवडणुकीत जोरदार टीका केली होती, त्यामुळे 
 
शिवसेना नाराज आहे. सोमय्या उभे राहिले तर त्यांना कोणतीही मदत करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत सापडली 
 
आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती