कांचन कुल दौंडमध्ये सक्रिय असून, तेथील विविध कार्यक्रमात त्या हजेरी लावत असतात. त्यांचे पती राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे सहकारी असून, 2014 साली राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत राहुल कुल यांनी माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता सुळे विरोधात कुल असे चित्र स्पष्ट असून बारामतीची जनता कोणाला निवडणून देणार आणि कांचन या पवारांना किती मोठा धक्का देतील हे निकालावरून दिसून येईल.