पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद पवारांनीकेलेलं विधान अयोग्य - मुख्यमंत्री

सोमवार, 15 एप्रिल 2019 (09:30 IST)
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते विरोधकांना प्रत्येक आरोपावर उत्तर देत आहेत. असेच उत्तर आणि टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. फायटर प्लेन असलेले राफेल खरेदीचा व्यवहार माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना अमान्य होता त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले, यावर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाष्य  केल असून राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद पवारांनीकेलेलं विधान अयोग्य आहेच अशी टीका केली आहे. पत्रकारांशी राफेलवरुन शरद पवारांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की शरद पवारांनी हे विधान करण्याची अजिबात गरज नव्हती. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर असं वक्तव्य करणं फार अयोग्य असून, मनोहर पर्रिकर असते तर याचं उत्तर नक्कीच दिलं असतं. मात्र राहुल गांधी यांनीही याआधी असेच काहीसे बोलण्याचा प्रयत्न केला होता, मृत्यूच्या 8 दिवस आधी मनोहर पर्रिकर बोलले होते. जर मला संधी मिळाली तर मोदींसाठी किमान 2 प्रचारसभा तरी घेईन कारण असा पंतप्रधान देशाला परत मिळणार नाही. 
 
कोल्हापूर या ठैकानी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राफेल करारावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. राफेल खरेदी व्यावहारात गैरप्रकाराची तक्रार झाली. विमानांच्या किंमती तीन वेळा बदलण्यात आल्या. हा सर्व व्यवहार तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पटला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंत केले, असे शरद पवार म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आणि पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती