कॉंग्रेस मध्ये अंतर्गत कलह अशोक चव्हाण देणार राजीनामा

शनिवार, 23 मार्च 2019 (17:20 IST)
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता पूर्ण रूपाने बाहेर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आता राजीनामा देणार असे चित्र आहे. राज्यात पक्षात कोण ऐकत नसल्यानं अशोक चव्हाण राजीनामा देतील अशी शक्यता आहे. कॉंग्रेस नेते  अशोक चव्हाण यांची चंद्रपुर येथील कार्यकर्त्यांसोबतची ऑडिओ क्लिप वायरल झाली असून, चव्हाण हे पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे वैतागल्याचं पुढे येते आहे. चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसने लोकसभेसाठी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र बांगडे यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांजवळ नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांनी चव्हाण आणि वडेट्टीवार यांच्याशी केलेली संभाषण क्लिप वायरल झाली. दोघेही राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत प्रचार जोरात सुरु असतांना अतंर्गत कलहाचा जोरदार फटका कॉंग्रेसला बसेल अशी शक्यता आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती