आता काय पार्थला फासावर देणार का ? - अजित पवार

सोमवार, 8 एप्रिल 2019 (08:24 IST)
यावेळी अजित पवार यांनी पुत्र आणि मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी चर्चमध्ये जाऊन वादग्रस्त फादरच्या घेतलेल्या भेटीवरही आपले मत व्यक्त केले आहे. पार्थने चर्चमध्ये जाऊन जे  दर्शन घेणे हे फासावर लटकवण्यासारखी चूक तर  नाही ना ? अशी चूक माझ्याकडून घडली असती तर हा वेगळी  गोष्ट होती. मात्र  मीडियाने इतका  बाऊ करण्याची अजिबात  गरज नव्हती. पार्थ अजून नवखा असून,  त्याला मी चार गोष्टी समजावून सांगितल्या. त्याच्याबरोबर असलेल्या लोकांनी त्याला चर्चमध्ये नेले होते. तो स्वत: गेला नव्हता, असे म्हणत अजित पवारांनी आपल्या मुलाची पाठराखण केली . पंढरपूर येथे अजित पवार पुढे म्हणाले की  “माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंच्या प्रचाराच्या निमित्ताने काल माळशिरस येथे कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला. 
 
आणीबाणी लागू झाली नसती तर मी राजकारणात नसतो - नितीन गडकरी 
 
 देशात आणीबाणी लागली व  आमचा राजकीय प्रवास सुरू एका अर्थाने सुरु  झाला,  जर  देशात आणीबाणी लागली नसती तर आम्ही राजकारणामध्ये आलो नसतो,  मी देशातील आणीबाणीचे प्रॉडक्ट असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री व नागपूरचे भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी केले आहे. नितीन गडकरी यांच्या महाविद्यालयीन व  सुरुवातीच्या राजकीय जीवनातील साथीदारांच्या वतीने नागपुर येथे  'नितीन गडकरी, दोस्तों के बीच' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गडकरी यांनी अनेक जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. गडकरी  महाविद्यालयात गेल्यावर  पहिल्याच वर्षात देशात आणीबाणी लागू झाली होती. त्यावेळी सर्वच  सरकारच्या निर्णयाच्या  बाजूने होते.  मात्र आम्ही विरोध केला,  आंदोलने केली , लाठ्या खाल्ल्या. आम्ही सर्व सहकाऱ्याच्या स्कूटरवरुन फिरुन अर्धा कप चहा पीत होती असे  गडकरी यांनी सांगितले. सध्याचे राजकारण  पाहिले तर  काळी-पिवळी टॅक्सी झाली आहे. निष्ठा तर दूरची गोष्ट आता तर  कुणीही कुठे जातंय. पक्षात कोण येतं, का पक्ष सोडतोय, हे कुणाला काही माहित नाही. विचारधारेबाबत असलेली एकनिष्ठता कमी होत आहे असे गडकरी यांनी  खंत वुक्त केली. नितीन गडकरी यांना भाजपने पुन्हा एकदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली  असून त्यांच्याविरुद्ध भाजपमधून काँग्रेसचे नाना पटोले उमेदवार आहेत. मोदी लाटेत  गडकरी पावणेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते.गडकरी हे भविष्यातील प्रधानमंत्री पदाचे दावेदार असल्याची दाट शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती