"महाराज उद्या केव्हां येऊ?"

शुक्रवार, 9 जुलै 2021 (17:07 IST)
"महाराज माझे मन स्थिर होत नाही, खूप चंचल आहे. काय करावे?" गण्याने महाराजांना विचारले.
 
"पायाच्या एका करंगळीवर हातोडीने मोजून तीन दणके दे. तुझे मन स्थिर होईल. चंचलता पूर्णपणे जाण्यासाठी असे सतत एकवीस दिवस कर." महाराज म्हणाले.
 
गण्या उठला. खाली वाकला. तो नमस्कार करेल ह्या समजूतीने महाराजांनी पाय पुढं केले... 
 
काही कळण्याच्या आत हातोडीचे तीन दणके त्याने महाराजांच्या पायाच्या करंगळीवर हाणले. महाराज लागले बोंबलायला. गण्याने हळूच विचारले, "महाराज उद्या केव्हां येऊ?"

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती