आई : अरे सुहास ऊठ. तुला कॉलेजला जायचे आहे ना ? सुहास : आई मी आज कॉलेजला नाही जाणार. आई : सुहास तुला कॉलेजला जावच लागेल. सुहास : नाही आई मी नाही जाणार. आई : मला दोन कारणे सांग तुला का नाही जायचं . सुहास : सगळी मुलं माझा राग करतात. सगळे शिक्षकही माझा राग करतात. आई : चल ऊठ आणि तयार हो. सुहास : मला दोन कारणे सांग. मी कॉलेजला का जावं. आई : तुझं वय आता ५५ वर्षे आहे . तू कॉलेजचा प्राचार्य आहेस.