'धोकादायक' कतरीना

IFMIFM
जर तम्ही कॅटरीना कैफ किंवा शाहिद कपूरचे चाहते असाल आणि तुम्हाला या दोघांपैकी कुणाचेही फोटो डाऊनलोड करून घेण्‍याची इच्‍छा असेल तर जरा थांबा तसे करण्‍यापूर्वी ही बातमी वाचा. कारण तुम्ही तसे करणे धोकादायक ठरू शकते. कारण आता हे दोघेही तुम्हाला आनंद देण्‍यापेक्षा अ‍डचणीत अडकवू शकतात.

हा दावा केला आहे ‘एन्टी वायरस’ आणि सायबर सुरक्षा तंत्र बनविणा-या ‘मॅकफे’ इंटरनेशनल या कंपनीने. मॅकफेने कॅटरीना आणि शाहिद यांचे नाव शोधण्‍यास भारतातील सर्वांत मोठा धोका म्हटले आहे.

इंटरनेटवर आपण आपल्‍या आवडीच्‍या कलावंताचे नाव वापरण्‍याचा प्रयत्‍न करतो. मात्र असे करू नका कारण जर तुम्ही इंटरनेटवर शाहिद कपूरबद्दल वाचताहात किंवा कॅटरीनाचे फोटो शोधत आहात तर अशा वेळी आपल्‍या न कळत आपल्‍या संगणकात कुठलीही गोष्‍ट कळण्‍यापूर्वी व्‍हायरस (स्पायवेअर किंवा मालवेअर) शिरण्‍याची शक्यता असते.
त्‍यानंतर जेव्‍हा तुम्ही ‘इंटरनेट बँकिंग’वा वापर किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला गेला असेल तर ‘स्पायवेयर’ आणि ‘मालवेअर’द्वारे आपली माहिती दुस-यांपर्यंत पोचण्‍याची शक्यता असते.

या दोघांव्‍यतिरिक्त 'मॅकफे'ने आणखी असे आठ शब्द धोकेदायक असल्‍याचे म्हटले आहे. त्‍यात याहू मेल, वॅपट्रिक, ऑरकुट, रेडिफ मेल, हाउ टू अर्न मनी, नमिथा, शिमला आणि बीजिंग 2008 ऑलम्पिक असे ते शब्‍द आहेत.

वेबदुनिया वर वाचा