* कतरीनाचा जन्म हॉंगकॉंगमध्ये जाला. त्यानंतर ती अमेरिकेच्या हवाई बेटांवर गेली. वयाच्या १४ व्या वर्षी ती लंडनला तिच्या आईकडे गेली. आता ती मुंबईत रहाते.
* इतर परदेशी कलावंताप्रमाणे कतरीनाला कधीही व्हिसा मिळविणे, त्याची मुदत वाढविणे याबद्दल त्रास झाला नाही.
* वयाच्या १४ व्या वर्षी तिने दागिन्यांच्या जाहिरातीपासून मॉडेलिंगला सुरवात केली.
* भारतात आली तेव्हा तिने प्रख्यात फोटोग्राफर अतुल कसबेकरकडून फोटोसेशन करवून घेतले. त्यानंतर फेव्हिकॉल, लॅक्मे आणि वीट यांच्या जाहिराती केल्या.
* तिने रॅम्पवर फार शो केले नाहीत.
* २००५ च्या लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये 'फेस ऑफ द इयर' म्हणून तिची निवड करण्यात आली.
* तिचा आवडता भारतीय पदार्थ दही आणि भात आहे.
* ती भारतातील सर्वांत जास्त फोटो काढली गेलेली महिला आहे.
* गुगलवर २००८ मध्ये तिच्या नावे सर्वांधिक शोध नोंदवले गेले.
* एफएचएम इंडियाने काढलेल्या शंभर भारतीय सेक्सी महिलांच्या यादीत तिला पहिले स्थान मिळाले.