लोकांच्या मते जेव्हा श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांच्या शरीराचे दाह-संस्कार केले परंतू हृदय (पिंड) जळत राहिले. ईश्वरीय आदेशानुसार पांडवांद्वारे हे पिंड पाण्यात प्रवाहित केले गेले. पिंडाने लाकडाचा ओंडका अश्या प्रकाराचे रूप धारण केले नंतर राजा इन्द्रद्युम्न (प्रभू जगन्नाथांचे भक्त) यांनी त्याला जगन्नाथांच्या मूर्तीत स्थापित केले. त्या दिवसापासून आजपर्यंत ओंडका मूर्तीच्या आत विराजमान आहे. प्रत्येक 12 वर्षात मूर्ती परिवर्तित करण्यात येते परंतू लठ त्यात ठेवण्यात येतं.