* शास्त्राप्रमाणे या दिवशी सकाळी तीळ पाण्यात मिसळून स्नान करावं.
* स्नानानंतर शुभ्र वस्त्र धारण करून कृष्णाचं ध्यान करून षोडशोपचार अर्थात शास्त्रांत उल्लेखित 16 विधींमधून देवाची पूजा- अर्चना करणे श्रेयस्कर ठरेल.
* या दिवशी निराहार व्रत करून कृष्णाच्या नावाचा जप करावा.
* रात्री देवाच्या जन्मावेळी शंख, घंटा, मृदंग व इतर वाद्य वाजवून देवाचा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे.
* जन्मानंतर धणे- साखरेची पंजीरी, लोणी, खिरीचा नैवेद्य दाखवावं.
* व्रताच्या दुसर्या दिवशी पारायण करून मंदिरात ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, रजत, स्वर्ण व मुद्रा दान करावं.