होती अष्टमीची ती भयंकर काळरात्र,
यमुनेचं पाणी होतं पसरलं सर्वत्र,
पूर आला,पाण्यास असें बहु जोर,
वादळाचे थैमान होते रे घनघोर,
लीला तुझीच होती,हे ही होतं ठावें,
कारागृहात तूच ,रात्रीस जन्मास यावे,
निसटल्या साखळ्या, उघडले दार,
प्रभू तुझी रे किमया किती अपरंपार,
आलास जन्मा पोटी देवकीच्या,
छळा पासुनी रक्षिले सर्वा , भयंकर राक्षसांच्या!
धन्य ते गोकुळ, अन मथुरा झाले,
सावळे रूप मनोहारी तेथें जन्मा आले!
देउनी अर्जुना गीतेचे ज्ञान, सखोल,
जीवनामृत च केलं तू मानवा बहाल,
जीवनाची दिशादर्शक गीता आहे,
आत्मसात करून, जीवन धन्य होत आहे!
......अश्विनी थत्ते