घरुनच काम करा, ट्विटरने कर्मचाऱ्याना केला ई मेल

कोरोना विषाणूमुळे समाज माध्यमांच्या दुनियेमध्ये एक महत्त्वाचं व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या ट्विटर twitter साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी एक अतिशय महत्त्वाचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये कार्यालयात न येता आपल्या घरुनच काम करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना हा सल्ला देण्यात आला आहे. 
 
ट्विटरच्या एचआर विभागाच्या प्रमुख जेनिफर क्रिस्ठी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही शक्य ते सर्ल प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जगभरात आमच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही घरुनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. हा निर्णय़ घेण्यापूर्वी हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया येथील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगण्यत आलं होतं. पण, कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता आता आणखीही कर्मचाऱ्यांना अशाच सल्ला देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती