भारतातल्या १० भाषांमध्ये व्हॉट्सअॅप उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजीशिवाय हिंदी, बंगाली, पंजाबी, तेलगू, मराठी, तामिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम भाषांचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपची भाषा बदलण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन काही बदल करावे लागणार आहेत. पण सगळ्या फोनमध्ये हा पर्याय असणार नाही. फोन लँग्वेज रीड करत असेल तरच तुम्हाला हे फिचर वापरण्यात येईल.