आता व्हॉट्सॲपवर लॉगआउट होण्याचं फीचर उपलब्ध होणार आहे. ज्याने अॅपपासून ब्रेक घेणे सोपे होईल. सध्या विश्रांती घेऊ इच्छित असणार्यांना डिलिट हाच पर्याय उपलब्ध आहे. नव्या फीचरमुळे लोक काही दिवसांसाठी व्हॉट्सअपमधून लॉगआउट करू शकतील. व्हॉट्सॲपच्या नव्या बीटा व्हर्जनमध्ये लॉगआउटचा पर्याय देण्यात आला आहे. हे iso आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
Read Later या फीचरमुळे चॅटकडे दुर्लक्ष करण्याची सुविधा मिळेल.
ग्राहकांची गरज बघून व्हॉट्सअॅपने नवीन फीचर दिले आहेत. WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे झालेल्या वादांमुळे इतर चॅटिंग कंपन्या स्पर्धेत उतरल्यामुळे व्हॉट्सॲप पुन्हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी फीचर्स घेऊन आलं आहे.