व्हॉट्सअॅपवर आता चुकून पाठवलेला मेसेज एडिट कण्याची सोय

शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (12:05 IST)
व्हॉट्सअॅपने प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फीचर्स अॅड केल्याची माहिती ‘वॅबीटाइन्फो’ (WABetaInfo) या ट्विटर हँडलने दिली आहे. असे मेसेज बाय डिफॉल्ट डिसेबल केले जातील. याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.
 
विशेष म्हणजे यूझर्स फक्त नुकतेच (ठराविक कालावधीत) पाठवलेले व्हॉट्सअॅप मेसेजच डिलीट करु शकतील. जुने व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याची सुविधा नाही. व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्रॉईड 2.17.1.869 व्हर्जनवर हे फीचर उपलब्ध झाल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
गेल्याच महिन्यात व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंग सेवा भारतात सुरु केली आहे. अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजवर ही सुविधा उपलब्ध आहे. भारतात 16 कोटी व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. दररोज 10 कोटी व्हॉट्सअॅप कॉल्स होत असल्याची माहिती आहे.

वेबदुनिया वर वाचा