व्हॉट्सअॅपवर मर्यादा, एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येणार

शनिवार, 21 जुलै 2018 (09:09 IST)
अफवा आणि हत्या रोखण्यासाठी ग्राहकाला एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येतील अशी मर्यादा व्हॉट्सअॅप घालणार आहे. त्याचबरोबर ‘क्विक फॉरवर्ड’हे बटणही काढून टाकण्यात येणार आहे. ही मर्यादा केवळ भारतीय ग्राहकांसाठीच असेल. सध्या याची चाचपणी सुरू असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.
 
देशात गेल्या काही महिन्यांत अफवा पसरवणे, त्याची परिणती जमावाकडून निरपराधांची हत्या होण्यात झाल्यामुळे सरकारने व्हॉटस्ऍपला दोनदा नोटीस पाठवून चांगलेच खडसावले होते. खोटी माहिती पसरवण्यात व्हॉट्सअॅप थेट हात नसला तरी त्यांना अशा घटनांमध्ये चिथावणी देण्याला जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा केंद्र सरकारने दिला होता. मुके साक्षीदार न बनता अफवा रोखण्यासाठी तत्काळ पावले उचला, असे आवाहनही सरकारने केले होते. त्या पार्श्वभूमीवर व्हॉटस्ऍपने हे पाऊल उचलले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती