आपल्या समजप्रमाणे व्हाट्सअॅप आणि टेलीग्राम सारख्या इंस्टंट मेसेजिंग अॅप एंड-टू-एंड एंक्रिप्टेड असल्याचे वाटत असलं तरी एकदा विचार करण्याची गरज आहे कारण सिक्योरिटी फर्म Symantec च्या शोधकर्त्यांनी व्हाट्सअॅप आणि टेलीग्राम अॅपमध्ये एक बग असल्याचा दावा केला आहे ज्याच्या मदतीने कोणीही हॅकर्स आपल्या द्वारे पाठवण्यात आलेल्या मीडिया फाइल्सला एडिट करू शकतात. शोधकर्त्यांनी या बगला मीडिया फाइल जॅकिंग असे नाव दिले आहे.
शोधकर्त्यांद्वारे आपल्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सअॅप मीडिया फाइलला एक्सटर्नल स्टोरेजमध्ये जतन करतं. तसेच टेलीग्राम गॅलरीमध्ये जतन करतं. अशात या दोन्हीमधून कोणताही अॅप मीडिया फाइलवर नजर ठेवत नाही. अशात या मीडिया फाइल्सवर जॅकिंग अटॅक होण्याची शक्यता असते आणि फाइल संपादित देखील केली जाऊ शकते.
रिपोर्टप्रमाणे या बगचा फायदा घेत हॅकर्स फाइलचा चुकीचा वापर करत फोटो-व्हिडिओ आपल्या हिशोबाने एडिट करू शकतात. रिपोर्टप्रमाणे या बगमुळे कोणतेही डॉक्युमेंट, इन-व्हॉयस आणि ऑडियो फाइलमध्ये एडिटिंग सहज करता येऊ शकते. शोधकर्त्यांनी उदाहरण देऊन सांगितले की एक थर्ड पार्टी अॅपद्वारे फाइल्सला जॅकिंग अटॅक करणे अवघड नाही.