व्हॉट्स अ‍ॅप फेक न्यूज ओळखण्याचे प्रशिक्षण

मंगळवार, 19 मार्च 2019 (09:20 IST)
डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपने नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेससोबत कंपनी (नॅसकॉम) भागीदारी केली आहे. त्यातून फेक न्यूजविरोधात लढण्यासाठी अशा बातम्यांचा प्रसार रोखण्याचे काम करण्यात येणार आहे.
 
फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉट्स अ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीआधी व्हॉट्स अ‍ॅपवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या जाणार आहेत. या टिप्सच्या आधारे फेक न्यूज ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंदाजे एक लाख लोकांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. 
 
या प्रशिक्षणाची पहिली बॅच 27 मार्चला दिल्लीत सुरू होणार आहे.  त्यानंतर ग्रामीण आणि शहरी प्रतिनिधींसाठी एक कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. याशिवाय रोड शो आणि महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधण्याचेही व्हॉट्स अ‍ॅपचे नियोजन आहे. या प्रशिक्षणासाठी नॅसकॉमचे स्वयंसेवक मदत करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती