सीईआरटी-आयएन ने चेतावणी दिली आहे की हा ट्रोजन व्हायरस बेकायदेशीरपणे सॉफ्टवेयर डाउनलोड करणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट वर्ड, अडोबफ्लॅश आणि इतर सॉफ्टवेयरच्या रूपाने आपल्या फोनमध्ये शिरकाव शकतो.
एडव्हायजरीमध्ये सांगितल्या प्रमाणे इव्हेंटबॉट 200 आपल्या वित्तीय अॅप्सला टार्गेट करू शकतो ज्यात बँकिंग अॅप्स, पैसे पाठविणारे अॅप्स सामील असतील. हे व्हायरस पेपाल बिझनेस, रेवोलुत, बार्कलेज, युनिक्रेडिट, कैपिटल वन यूके, एचएसबीसी यूके, ट्रांसफरवाइज, कॉइनबेस, पेसेफकार्ड या वर टार्गेट करु शकतो.
सायबर सुरक्षा एजन्सीने देखील या व्हायरस पासून बचाव करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. एडव्हायजरीनुसार अज्ञात आणि अविश्वसनीय स्रोतांकडून मोबाईलचे अॅप्स डाउनलोड करू नये. अँटीव्हायरसचा वापर करा, आणि कुठल्याही सॉफ्टवेअरेला प्लेस्टोर वरून डाउनलोड करण्यापूर्वी त्याबद्दल खात्री करुन घ्यावी.