कोरोनाबाबत दिशाभूल करणारी माहिती माध्यमांमध्ये विशेषकरुन समाज माध्यमांमध्ये पसरवली किंवा पसरली जाते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्विटरने आता लेबल सिस्टम तयार केली आहे. हे लेबल प्लॅटफॉर्मच्या निवडक पेजशी लिंक असणार आहेत. याचबरोबर हे लेबल काही बाहेच्या विश्वासार्ह सुत्रांशीही लिंक असणार आहेत. यामुळे ट्विटद्वारे दावा केलेली माहितीच्या सत्यतेची पडताळणी होणार आहे.