ट्विटरच्या ‘What’s happening’च्या स्पेसमध्ये केवळ 140 कॅरेक्टर्समध्येच आपण काहीही लिहू शकतो. यापुढे व्यक्त होण्यासाठी कॅरेक्टर्स मर्यादा वाढवण्यात येणार आहे. हो आता ट्वीट करतांना आपण आता 140 वरुन 280 कॅरेक्टर्स म्हणजे आताच्या संख्येच्या बरोबर दुप्पट कॅरेक्टर वापरता येणार आहे. ट्विटरकडून या सर्व गोष्टींचे प्रयोग अर्थात टेस्टिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये टेस्टिंगबाबत माहिती देण्यासाठी एक ट्विट केला आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी 220-225 कॅरेक्टर्स वापरले आहेत.