आपोआप डिलिट होणार मेसेज
व्हॉट्सअॅपच्या या फीचरची यूजरना प्रतीक्षा आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी या फीचरचा बीटा व्हर्जन उपलब्ध करून दिला होता. यूजरनं सेट केलेल्या वेळेवर आपोआपच चॅट डिलिट होणार आहेत. चॅट डिलिट करण्यासाठी एक दिवस ते एका वर्षापर्यंत टाइम सेट करता येणार आहे. सुरुवातीला हे फीचर फक्त ग्रुप चॅटसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
ग्रुप चॅटफीचरमध्ये मोठा बदल
व्हॉट्सअॅप यंदा ग्रुप चॅटफीचरमध्ये मोठा बदल करणार आहे. रिपोर्टर्सनुसार, ग्रुप सदस्यांची संख्या वाढणारे फीचर लवकरच अपडेट करण्यात येणार आहे. सध्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 256 सदस्यांना अॅड करता येतं. अन्य प्रतिस्पर्धी कंपन्या मेसेजिंग अॅपवर किमान 5 हजार सदस्य अॅड करण्याची सुविधा देत आहे. त्यामुळं स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे नवीन फीचर व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे.