स्मार्टफोनची उतरणारी बॅटरी देते मुलाखतीपेक्षाही जास्त तणाव

मंगळवार, 3 एप्रिल 2018 (12:34 IST)
स्मार्टफोन सध्या आपल्या आयुष्यात असा काही एकरुप झाला आहे की, त्याच्यापासूनचा दुरावा सोडाच, त्याची बॅटरी उतरली तरी अनेकांना चांगला तणाव येतो. स्मार्टफोनची बॅटरी संपत असल्याचे पाहून काही जणांची मुलाखतीला जाताना वा एखाद्या महत्त्वाच्या बैठकीला विलंब झाल्यास जेवढा तणाव येतो, तशी अवस्था होते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. चीनमधील हुआवेई कंपनीच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात त्यांना असे दिसून आले की, लोक आपल्या र्स्माफोनची बॅटरी कमी होत असल्याचे पाहून अतिशय कासावीस होतात. प्रवासादरम्यान कारमध्ये बिघाड होणे वा घरी वीजपुरवठा खंडित झाला असेल तेव्हासुद्धा ही परिस्थिती जास्त खराब होते. मुलाखतीसाठी जातेवेळी व तातडीच्या बैठकीला उशीर होत असल्यास जेवढा तणाव येणार नाही, तेवढा फोनची बॅटरी संपल्यावर होतो. कंपनीने या अध्ययनासाठी ब्रिटनमधील दोन हजारांपेक्षा जास्त प्रौढ व्यक्तीसोबत बातचित केली. अध्ययनाचे प्रुख डॉ. लिंडा पापाडोपोलस यांनी सांगितले की, स्मार्टफोन आता आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनला आहे. लोक त्याला आपल्या संपर्काचे अत्यावश्यक साधन म्हणून पाहत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती