नोटीफिकेशन्स पाहा डेस्कटॉपवर

रविवार, 23 सप्टेंबर 2018 (00:30 IST)
व्हॉट्‌सअ‍ॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र, इतर मॅसेज, अ‍ॅपची नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी फोनवर वारंवार जावेच लागत होते. आम्ही तुम्हाला अशा अ‍ॅपबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या फोनवर आलेले मॅसेज, नोटिफिकेशन तुम्हाला डेस्कटॉपवर देते. पुश बुलेट असे या अ‍ॅपचे नाव असून ते अवघ्या 3.5 एमबीचे आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर आणखी एक सेटिंग डेस्कटॉपवर करावी लागणार आहे. पुश बुलेट अ‍ॅप डाऊनलोड केले की त्यावर फेसबुक किंवा गुगल अकाउंटद्वारे जोडण्यासाठी विचारले जाते. तेथे लॉग इन केल्यावर डेस्कटॉपवर जाऊन तेथील ब्राऊजरवर पुश बुलेटचे एक्सटेंशन अ‍ॅड करावे लागणार आहे. यानंतर या एक्टेंशनमध्ये जे मोबाइलच्या अ‍ॅपमध्ये लॉगिन आहे त्या अकाउंटसारखेच लॉगइन करावे लागणार आहे. या अकाऊंटध्ये लॉग इन केल्यानंतर ब्राऊजरवर उजव्या कोपर्‍यामध्ये एक बुलेटच्या आकाराचा सिम्बॉल दिसतो. यावर तुम्हाला आलेली नोटीफिकेशन समजतात. तसेच एखादा मॅसेज आला तर त्याला रिप्लाय देण्यासाठी नवी छोटी चॅट विंडोही उघडते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती