रिलायन्स जिओने वर्षभरापूर्वी टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश करत धक्का दिला होता. जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवसांपूर्वी जिओने आपला फोन बाजारात दाखल करत टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक धक्का दिला होता. त्यानंतर ग्राहकांना विविध ऑफर्स देत सातत्याने आकर्षिक करण्यात जिओ यशस्वी झाले आहे.
यामध्ये कॉलिंगसाठीचा दर प्रतिमिनिट 50 पैसे इतका ठेवण्यात आला असून रोमिंग 2 रुपये प्रतिमिनिट असेल. जिओच्या पोस्टपॅड प्लॅनचाच एक भाग असलेली ही नवीन सुविधा ग्राहकांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. या प्लॅनची बेसिक रक्कम 199 रुपये इतकी असून ही रक्कम ग्राहकांना दरमहा भरावी लागेल. विशेष म्हणजे आपल्या नंबरवर इंटरनॅशनल कॉल सर्व्हिस सुरू करण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे सिक्युरीटीडिपॉझिट ठेवण्याची आवश्यकता नाही. या शानदार ऑफर्सद्वारे ग्राहक अमेरिका किंवा कॅनडाला 50 पैसे प्रतिनिट या दराने कॉल करु शकतात. तर बांगलादेश, चीन, फ्रान्स आणि लंडनमध्ये कॉल करण्यासाठी प्रतिमिनिट 2 रुपये खर्च करावा लागेल. इस्त्रायल, नायझेरिया, सौदी अरब, स्वीडन आणि अन्य देशात एक मिनिट बोलल्यास 6 रुपये प्रतिमिनिट खर्च येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रोमिंगसाठीही कोणताही नवीन डेटा प्लॅन घेण्याची आवश्यकता नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.