'वर्क फ्रॉम होम'साठी जिओकडून 10Mbps स्पीडचे इंटरनेट फ्री
रिलायन्स जिओने #CoronaHaaregaIndiaJeetega ही मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत कोणतेही शुल्क न देता इंटरनेट बेसिकची सुविधा देण्यात येणार आहे. यात 10Mbps स्पीडचे इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. ही सेवा केवळ जिओ फायबर उपलब्ध असेल तिथे मिळू शकेल. परंतु, राउटरसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. जे रिफंडेबल असतील.
डबल डेटा आणि फ्री कॉलिंग
जिओनं आपले काही 4G वाउचर मोडिफाइड केला आहे आणि त्याचे डेटा बेनिफिट्स दुप्पट केलं आहे. रु. 11, रु.21, रु. 51 आणि रु. 101 प्रीपेड प्लान आता दुप्पटीनं अधिक डेटा देत आहेत.
11 रुपये असलेला पॅकसोबत 800 MB डेटा आणि 75 मिनिटं जिओ टू अन्य नेटवर्क कॉलिंग सुविधा आहे.
21 रुपयांचा प्रीपेड 2GB डेटासोबत 200 मिनिटं जिओ टू जिओ कॉलिंगची सुविधा देखील आहे.
51 रुपयांचा डेटा बूस्टर पॅकमध्ये 500GB जिओ टू अन्य नेटवर्क फायद्यासोबत 64 GB डेटा प्रदान करतो.
101 रुपयांचा प्लान आता 12 GB डेटासोबत येतो आणि यात 1000 मिनिटं जिओ टू अन्य नेटवर्कही मिळेल.