आता बनावटी नोटांना ओळखणे होणार सोपे

गुरूवार, 9 जानेवारी 2020 (11:27 IST)
RBI ने नवा मोबाइल एप आणला आहे ज्याने आता बनावटी नोटांना ओळखणे सोपे होणार. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने अंध लोकांसाठी हे एप लाँच केले आहे. या ऍपच्या साहाय्याने हे अंध लोक बनावटी नोटांना सहज पणे ओळखू शकतील. ह्या एपामुळे हे कळू शकेल की नोट खरी आहे की नाही. हे एप मोबाइल धारक Google Play Store वरून डाउनलोड करू शकता. ह्या एपाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बनावटी नोट चांगल्या प्रकारे ओळखते आणि  ध्वनी माध्यमातून आवश्यक माहिती पण देते. चला मग RBI च्या या नव्या एप बद्दल जाणून घेऊ या. 
 
Mobile Aided Note Identifier एप ची वैशिष्ट्ये :-
 
RBI एप आपल्या धारकांना नोटांची अचूक माहिती देते. या व्यतिरिक्त धारकांना या एप मध्ये ऑडिओ सेन्सर मिळेल. जेणेकरून ते त्यांच्या आवाजाद्वारे त्यावर नियंत्रण ठेवतील. नोटा चुरघळलेल्या अवस्थेमध्ये पण असल्यास तरी हे एप सहजपणे ओळखू शकेल. हे एप सहजपणे इंटैग्लियो प्रिटींग, टेक्सटाईल मार्क, साइज, नंबर, रंग आणि मोनोक्रोमेटिक पॅटर्नचा तपास करतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती