‘confidential mode’ नुसार ईमेल मिळालेला व्यक्ती मेलमधील कंटेंट कोणाशीही शेअर करु शकणार नाही. इतकंच नाही तर, कंटेंट कॉपी, डाउनलोड किंवा प्रिंट देखील करता येणार नाही. ईमेल केव्हा डिलीट करायचा याची वेळ मेल पाठवणारा (सेंडर) ठरवेल. मेल डिलीट करण्याची वेळ एक आठवडा, एक महिना किंवा काही वर्ष देखील असू शकते. याशिवाय नव्या मेलमध्ये पासवर्ड प्रोटेक्शनचं महत्त्वाचा पर्याय देखील दिला जाणार असल्याची माहिती आहे. नव्या जीमेलमध्ये ई-मेल snooze करण्याचा पर्याय देखील असेल, तसंच कंपनी एक ऑफलाइन ईमेल स्टोरेजचा पर्याय देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.